Director’s Occult

माननीय श्री.सुनील बापूराव नागरगोज

(संस्थापक अध्यक्ष – संभाजी राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्था. संभाजीनगर)

मी श्री सुनील बापूराव नागरगोजे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संभाजीनगर.

एक उद्योजक म्हणून माझी ओळख समाजामध्ये आहे.

अतिशय खडतर प्रवास करत करत आता एक सदन आयुष्य जगत असताना, तारुण्यात जेव्हा माझ्याकडे काहीही नव्हते तरी मी सामाजिक कामे करत असायचो कधीही, कुणालाही मदतीसाठी तत्पर असायची याची सतत आठवण येत होती. त्यामुळे सतत विचार करत असायचो की समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करावे पण काय?करावे हे सुचत नव्हते.

अशातच तारण्यात विविध व्यसनामुळे बरबाद झालेले तरुण नजरेस दिसत गेली.व्यसनामुळे कुटुंबाची कुटुंबे उध्वस्त झालेली पाहिली अन मन खिन्न झाले.यातूनच निश्चय केला की व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करायचे. योग्य समुपदेशन योग्य मार्गदर्शन, शारीरिक, मानसिक विकास करायचा. या व्यसनाधीन झालेल्यांना व्यसनमुक्त करायचे आणि एवढेच नाही तर या व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीची पुनर्वसन ही करायचे.त्यांना उद्योग, व्यवसाय प्रशिक्षण द्यायची. व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करायची. त्यांचे कुटुंब सुखी कुटुंब कसे होईल यासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करायचे.

त्यातूनच मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. व्यसनमुक्ती नैराश्यातून मुक्ती व हरवलेली शक्ती पुन्हा निर्माण करून, एक सक्षम तरुण घड कार्य मुकलाई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून करत आहोत.

भविष्यातील योजना
  • मुक्ताई वृद्ध सेवा भवन स्थापन करणे.
  • मुक्ताई युवा उद्योजक विकास मंच स्थापन करणे.
  • मुक्ताई महिला विकास म्हणजे स्थापन करणे.

धन्यवाद

आपल्या सावलीत उभा.

श्री सुनील बापूराव नागरगोजे.

सौ सुमन सुनील नागरगोजे

(संस्थापक अध्यक्ष- मुक्ताई महिला विकास मंच सभाजीनगर )

मी सौ सुमन सुनील नागरगोजे, संस्थापक अध्यक्ष मुक्ताई महिला विकास मंच संभाजीनगर.

महिला सक्षमीकरण म्हणजे नेमके काय?

याची खूप उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर होती मग ठरवले की आपणही काहीतरी करुयात. मग मीही उद्योग, व्यवसायात कार्यरत झाले.आणि आज समाजामध्ये एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून माझी वाटचाल सुरू आहे. परंतु समाजामध्ये खूप प्रिया अशा आहेत ज्यांच्याकडे कार्य करण्याची ताकद आणि उमेद आहे परंतु त्यान व्यासपीठ नाही.

ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ‘मुक्ताई महिला विकास मंचाची स्थापना करण्यात आली. आज ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो महिला स्वावलंबी केल्या आहेत.भविष्यात महिला उद्योग व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणार आहोत. महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणार आहोत.

प्रत्येक महिलेचा विकास म्हणजेच प्रत्येक कुटुंबाचा विकासया तत्वानुसार पुढील वाटचाल सुरू आहे आपणही या प्रवासात सामील व्हावे ही प्रामाणिक इच्छा.

आपल्या सावलीत उभी

सौ. सुमन सुनील नागरगोजे

Chandralok Building, Near BhajivaliBai Putla, Usmanpura Aurangabad.

8857802377      info@muktaivyasanmukti.com

Rehabilitation Center